सकाळ डिजिटल टीम
कोळंबीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी आवश्यक आहेत.
कोळंबीमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोळंबीच्या सेवनाने शरीर ऍनिमियासारख्या आजारापासून दूर राहते, कारण रक्तात ऑक्सिजनची प्रमाण वाढते.
कोळंबीमध्ये झिंक आणि सेलेनियम असतात, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला मजबूती देतात.
व्हिटॅमिन B12 आणि फोलेटमुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते आणि शरीरातील ऑक्सिजन वाढतो.
कोळंबीमध्ये व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात असतो, जो नर्व्ह सिस्टीमच्या कार्यासाठी महत्त्वाचा आहे.
कोळंबी हा एक सुपरफूड आहे जो विविध पोषणतत्त्वांनी भरलेला आहे, ज्यामुळे शरीराचे सर्वांगीण स्वास्थ्य सुधारते.