प्रेरणेचा स्त्रोत! नीरज चोप्रानं घेतली अजून एक ग्रेट भेट

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्रा जगभरातील दिग्गज व्यक्तीमत्वांची भेट घेत असतो. याचो फोट देखील तो सोशल मीडियावर टाकत असतो.

नीरज चोप्राने नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. याचे फोटो देखील त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोला नीरजने कॅप्शन दिलं की रतन टाटा सरांना भेटण्याची संधी मिळाली यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. ते एक खरे दूरदृष्टी असलेले व्यक्ती आणि प्रेरणा स्थान आहेत.

नीरज चोप्राने यापूर्वी भारताचा फुटबॉलपटू सुनिल छेत्रीची देखील भेट घेतली होती. छेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

काही दिवसांपूर्वी नीरज दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररशी देखील भेटला होता. त्याचे हे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

अंबानींमुळे नाही तर या क्रिकेटपटूंमुळेही जामनगर 'जगात फेमस'