Saisimran Ghashi
चहा पिणे कोणाला नाही आवडत? हा तर आपला जीव की प्राण
पण रिकाम्यापोटी चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिड तयार होतो, ज्यामुळे अॅसिडिटी, गॅस व पोटात जळजळ होण्याची शक्यता वाढते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस होतो आणि हे शरीरातील लोह शोषून घेते
चहातील टॅनीन हे घटक रिकाम्या पोटात घेतल्यास पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे अपचन, मळमळ आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यामुळे मेंदू अधिक तणावग्रस्त होतो, ज्यामुळे झोप न लागणे किंवा उशिरा झोप येणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
रोज रिकाम्यापोटी जास्त साखरेचा दुधाचा चहा प्यायल्यास ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.