Saisimran Ghashi
सकाळी चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळत नाही, यामुळे थकवा जाणवतो.
रोज अशा प्रकारचे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास कालांतराने अॅसिडिटी, गॅस्ट्रिक अल्सर व इतर पचन विकार होऊ शकतात.
रिकाम्यापोटी काय खाणे टाळावे, जाणून घेऊया
केळी, दही किंवा संत्रीसारखे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
मसालेदार किंवा आम्लयुक्त फळे रिकाम्या पोटी घेतल्यास पोटात जळजळ व आतड्यांमध्ये सूज येऊ शकते.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास कोर्टिसोल हार्मोनची पातळी असंतुलित होते, त्यामुळे तणाव व चिडचिडेपणा वाढतो.
दहीसारखे थंड पदार्थ सकाळी उपाशीपोटी घेतल्यास पचनक्रिया मंदावते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.