संतोष कानडे
पृथ्वीच्या निर्माणाबाबत आणि अंताबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. शिवाय हे जग कुणाच्यातरी नियंत्रणाखाली चालतो, तो नियंत्रक कोण? असा प्रश्न कायम सतावत असतो.
याबाबत महान शास्त्रज्ञ न्यूटनने केलेलं भाकीत पुढे येत आहे. आयझॅक न्यूटनचं ३०० वर्षांपूर्वीचं एक पत्र सापडलेलं आहे.
गणितीय समिकरणं आणि बायबलच्या आधारावर न्यूटनने जगाच्या अंताबाबत भविष्यवाणी केली होती.
जगामध्ये एक भलमोठं युद्ध होईल आणि हेच युद्ध जगाच्या अंताची सुरुवत ठरेल, असं न्यूटन पत्रामध्ये सांगतो.
जगाचा अंत झाल्यानंतर नवीन जगाचा उदय होईल आणि ते नवं जग आनंदी आणि शांत असेल, असा दावा करण्यात आलाय.
न्यूटनने केलेल्या दाव्यानुसार, हे जग २०६० मध्ये नष्ट होईल. यासाठी बायबलचा आधार घेण्यात आलेला असून जुनी कालमापन पद्धत वापरण्यात आलेली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जगाच्या अंताबाबत यापूर्वी वेगवेगळे दावे झालेले आहेत.
बाबा वेंगा यांनीही यासंदर्भात भविष्यावाणी केलेली आहे. याच काळात जगाचा अंत होईल, असं सांगण्यात आलेलं होतं.
२०६० मध्ये खरंच जगाचा अंत होणार का? याबाबत मतमतांतरे आहेत. अनेकजण तर्क लढवत आहेत.