संतोष कानडे
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निजाम आणि निजाम सरकारची चर्चा होतेय.
निजाम हा शब्द मूलतः उर्दू भाषेतून आलेला आहे. पुढे हैदराबादच्या शासकांसाठी त्याचा उपयोग होऊ लागला.
हैदराबाद संस्थानाचे शासक निजाम-उल-मुल्क म्हणून ओळखले जात होते, ज्याचा अर्थ राज्याचा प्रशासक किंवा राज्याचा व्यवस्थापक असा होतो.
पुढे निजाम हे पद त्यांच्यासाठी एक सामान्य पदनाम बनले आणि शासन व्यवस्थेला निजाम म्हणून संबोधन मिळालं.
निजाम म्हणजे मुळात व्यवस्थापन किंवा सुनियोजन. एखाद्या शासन व्यवस्थेसाठी पहिल्यांदाच हा शब्द वापरला गेला.
निजाम हे शाही घराण्यांचे प्रमुख होते. ते भारताच्या दक्षिण भागामध्ये स्थिरस्थावर झाले होते.
निजाम घराण्याचा इतिहास १७व्या शतकापासून सुरु झाले. १९४८ मध्ये हे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं.
आज हा शब्द रोज वापरला जातोय. त्याचं कारण म. या गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.
केवळ मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या नोंदी तपासासून त्याप्रमाणे ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.