Aarti Badade
दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने केल्याने मन ताजेतवाने होते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
पिरॅमिड चालणे हा एक विशेष प्रकारचा चालण्याचा व्यायाम आहे. यात तुम्ही हळूहळू चालण्यास सुरुवात करता, नंतर वेग वाढवता आणि सर्वाधिक वेग गाठल्यावर पुन्हा हळूहळू वेग कमी करता.
या संपूर्ण वॉकला सुमारे २० ते २५ मिनिटे लागू शकतात. तुम्ही तुमच्या फिटनेस पातळीनुसार वेग आणि वेळ वाढवू किंवा कमी करू शकता.
या प्रकारच्या वॉकमध्ये वेग बदलल्यामुळे स्नायू सक्रिय होतात आणि संपूर्ण शरीर कार्यरत राहते. यामुळे हृदयाची गती वाढते, जास्त कॅलरीज बर्न होतात आणि तुमचा स्टॅमिना सुधारतो.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या व्यायामामुळे सांध्यांवर जास्त ताण पडत नाही, त्यामुळे वृद्ध लोकही तो सहज करू शकतात.
सुरुवात करण्यापूर्वी ५ मिनिटे वॉर्म अप करा,पहिली २ मिनिटे हळू चाला,नंतर दर २ मिनिटांनी तुमचा वेग थोडा वाढवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पूर्ण वेग गाठत नाही.
त्यानंतर, दर २ मिनिटांनी तुमचा वेग कमी करायला सुरुवात करा,शेवटी ५ मिनिटे हळू चालून पूर्ण करा,व्यायामानंतर शरीर थोडे ताणून (Stretching) घ्या.
तज्ञांच्या मते, पिरॅमिड वॉकिंग हा वजन कमी करण्याचा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. वेग बदलल्यामुळे शरीर सामान्य चालण्यापेक्षा जास्त काम करते आणि कॅलरीज जलद बर्न होतात.