Aarti Badade
भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये पंचामृत अत्यंत पवित्र मानले जाते. हे चरणामृत म्हणून देवाला अर्पण केले जाते.
पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, साखर, तूप आणि मध यांचा वापर केला जातो.
दह्यातील प्रोबायोटिक्स पचनशक्ती वाढवतात आणि पोटाच्या तक्रारी दूर करतात.
दूधामुळे कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन B12 मिळते, जे हाडे मजबूत करतात.
चरणामृत प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
पंचामृतमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे रोगांपासून संरक्षण करतात.
तुळशी व गंगाजलामुळे चरणामृत अधिक पवित्र व आरोग्यवर्धक बनते.
मध आणि साखर त्वचेला पोषण देतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.