Amit Ujagare (अमित उजागरे)
भारतातील हे एकमेव राज्य आहे, जिथं आजवर एकही रेल्वे स्टेशन नाही. पण लवकरच इथंही रेल्वे स्टेशन तयार होणार आहे.
सिक्कीम हे ईशान्य भारतातील एक महत्वाचं राज्य आहे. हिरवीगार जंगलं आणि निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे राज्य आहे. नेपाळ, भूतान आणि तिबेटच्या सीमांनी घेरलेलं आहे.
सिक्कीममधला हा अत्यंत कठीण भूभाग आहे. हिमालयाचं क्षेत्र आणि भूस्खलनाची शक्यता असल्यानं रेल्वे नेटवर्कसाठी मोठं आव्हान आहे. पर्यावरण संरक्षणाचा देखील मुद्दा आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, रेल्वे नेटवर्क सिक्कीमच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील परिस्थितीला नुकसान पोहोचवतात. यामुळं जंगल आणि इथल्या लहान-मोठ्या प्रण्यांवर परिणाम होतो.
रेल्वे नसल्यामुळं सिक्कीममध्ये सुंदर आणि सुव्यवस्थित रस्त्यांचं जाळं आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इथल्या रस्त्यांची काळजी घेतं.
सिक्कीमला जाण्यासाठी प्रवाशी पश्चिम बंगालच्या सिलीगुडी किंवा न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनचा वापर करतात. या ठिकाणाहून सिक्कीमसाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे.
सिक्कीमचं हे पहिलं रेल्वे स्टेशन होणार आहे. सध्या या रेल्वे स्टेशनचं बांधकाम सुरु आहे. हे रेल्वे स्टेशन गंगटोक, पाकयोंग आणि मंगन जिल्ह्यांतील रेल्वे नेटवर्कला जोडणार आहे.
रंगपो रेल्वे स्टेशनची खासियत म्हणजे या ठिकाणी तीन प्लॅटफॉर्म असतील आणि चार रेल्वे रेल्वे ट्रॅक असतील. सिवोक-रंगपो रेल्वे लाईन ४४ किमी लांब असेल, जे सिक्कीमला देशाशी जोडेले जाईल.