पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नव्हता सर्वांना प्रवेश; यासाठी कोणी दिला लढा?

Amit Ujagare (अमित उजागरे)

स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर

१९४७ साली भारत स्वतंत्र होणार होता. त्याचवेळी एक मोठा सामाजिक लढा सुरू झाला. तो होता विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचा!

साने गुरुजींची आक्रमक भूमिका

साने गुरुजींनी स्पष्ट सांगितलं की, "पंढरपूरचं विठोबा मंदिर अस्पृश्यांसाठी उघडलं पाहिजे. नाहीतर मी आमरण उपोषण करेन!"

जनजागृतीचा झंझावात

जानेवारी ते एप्रिल १९४७ या चार महिन्यांत साने गुरुजींनी ४०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील गावागावात जाऊन लोकांना जागं केलं.

फळ देणारी चळवळ

या आंदोलनामुळं ३०० पेक्षा जास्त मंदिरं सर्वांसाठी उघडली गेली! पण पंढरपूरचं विठ्ठल मंदिर मात्र अजूनही बंदच होतं.

पंढरपूरमधील प्रतिकार

पंढरपूरचं मंदिर सांभाळणारे बडवे मंडळी होते, त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात येऊ देण्यास विरोध केला.

आमरण उपोषण सुरू!

साने गुरुजींनी थेट पंढरपूरमध्ये १ मे १९४७ ला आमरण उपोषण सुरू केलं. त्यांचं एकच ध्येय होतं, विठोबा सगळ्यांचा असावा!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

दहा दिवस उपोषण सुरू होतं. वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या. समाजात चर्चा सुरू झाली. लोकांचा दबाव वाढू लागला.

दहा दिवसांनी आलं यश

शेवटी, १० दिवसांनंतर विठोबा मंदिर सर्वांसाठी खुलं झालं! याचा अर्थ, अस्पृश्यांसाठीही ते खुलं झालं.