Anuradha Vipat
जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
आता जान्हवी कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने मोठे खुलासे केले आहेत.
आता नुकतीच जान्हवी तिच्या कपड्यांविषयी बोलताना दिसली आहे.
जान्हवी कपूरचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे देखील दिसत आहेत.
जान्हवी कपूर म्हणाली की, माझे जवळपास सर्व कपडे आणि दागिने हे भाड्याचे असतात.
आता जान्हवी कपूरच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
फक्त जान्हवी कपूरच नाही तर जवळपास सर्वच कलाकार असे करत असल्याचे देखील तिने सांगितले आहे