शरीराला ऊर्जा देणारे मुख्य घटक किती आणि कोणते?

संतोष कानडे

ऊर्जा

शरीराला ऊर्जा देणारे तीन घटक असतात. त्यात कार्बोदके, प्रथिने आणि चरबीचा समावेश आहे.

कार्बोहायड्रेट्स

कार्बोहायड्रेट्स हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. पचनानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन त्वरीत ऊर्जा पुरवतात.

कार्बोदके

कार्बोदकांचा स्त्रोत- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, बटाटे, फळे, दूध, इत्यादी आहे.

प्रोटिन

ऊर्जा देणारा दुसरा घटक हा प्रोटिन म्हणजेच प्रथिने आहेत. मुख्यतः शरीराच्या पेशींच्या दुरुस्ती आणि मसल्ससाठी प्रोटिन लागते.

शरीर

शरीरात कार्बोहायड्रेट कमी असल्यास प्रोटिन ऊर्जादेखील देते, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

दूध, डाळी

प्रथिनांचा स्त्रोत अंडी, मासे, मांस, दूध, डाळी, सोया, बदाम असा आहे.

फॅट्स

शरीराला ऊर्जा देणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, फॅट्स किंवा चरबी आहे.

ऊर्जेचा मुख्य स्त्रोत

फॅट्समुळे दीर्घकालीन ऊर्जा साठवण होते. त्यामुळे हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. साठलेली चरबी हळूहळू ऊर्जा देऊ शकते.

बदाम, काजू

फॅट्सचा मुख्य स्त्रोत तूप, तेल, बदाम, काजू, ऑलिव्ह तेल, बटाट्याची साल असा आहे.

मसल्स

थोडक्यात काय तर कार्बोहायड्रेट्समुळे त्वरित ऊर्जा मिळते, फॅट्समुळे दीर्घकालीन ऊर्जा मिळते आणि प्रोटिनमुळे मसल्स आणि अतिरिक्त ऊर्जा मिळते.

सामान्य ज्ञान

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. प्रत्येकाने आपापल्या आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.