100 वर्षांपूर्वी जोतिबा मंदिर कसं होतं? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल चांगभलं..!

Saisimran Ghashi

ज्योतिबा म्हणजे तेजोमूर्तीचे रूप


ज्योतिबा किंवा केदारेश्वर हे ब्रह्मा, विष्णू, महेश व जमदग्नी यांच्या क्रोधांशाचे तेजोमय रूप आहे. 'ज्योत' म्हणजे तेज, प्रकाश त्यावरूनच 'ज्योतिबा' हे नाव आले आहे.

jyotiba temple 100 years old photos | esakal

तेज म्हणजे पंचमहाभूतातील तेजतत्त्वाचे प्रतीक


वाडीरत्नागिरीचा जोतिबा म्हणजे 'तेज' या पंचमहाभूतांपैकी एका तत्वाचे दैवत आहे. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र व शक्तीपूर्ण मानले जाते.

jotiba temple kolhapur old photos | esakal

मूळ मंदिराची स्थापना


सध्याच्या भव्य देवालयाच्या जागी पूर्वी छोटे मंदिर होते, जे किवळ (ता. कराड) येथील नावजी या भक्ताने बांधले होते.

jotiba mandir history | esakal

सध्याचे भव्य मंदिर


मूळ मंदिराच्या जागी ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी काळ्या बेसाल्ट दगडात भव्य मंदिर पुन्हा बांधले.

jotiba temple kolhapur pictures | esakal

दुसरे केदारेश्वर मंदिर खांबांशिवाय उभे


हे मंदिर इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले असून, ते खांबांशिवाय उभे असलेले अद्भुत रचना आहे.

jotiba temple kolhapur 150 years old photos | esakal

चर्पटअंबा व रामेश्वर


चर्पटअंबा (चोपडाई) मंदिर इ.स. १७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण यांनी बांधले, तर रामेश्वराचे मंदिर इ.स. १७८० मध्ये मालजी निकम यांनी बांधले.

jotiba dongar historical photos | esakal

मंदिर परिसरातील इतर रचनात्मक वैशिष्ट्ये


केदारेश्वर समोर नंदीच्या मूर्ती, पूर्वाभिमुख सटवाई, पश्चिमेला रामलिंग आणि भिंतींवर वीरगळ दगड मंदिराची ऐतिहासिकता दाखवतात.

jotiba temple rare photos | esakal

ज्योतिर्लिंग व केदारलिंग यांची स्थापना


ज्योतिबा (केदारनाथ) यांनी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. त्यांच्या मूळ अवतरण स्थळाचे स्मरण म्हणून हिमालयात 'केदारलिंग' स्थापन केले, म्हणून त्यांना केदारेश्वर म्हणतात.

jotiba hd photos | esakal

150 वर्षांपूर्वी कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर कसं होतं? ऐतिहासिक फोटो वाटेल आश्चर्य..!

mahalaxmi temple kolhapur 150 years old phistorical photos | esakal
येथे क्लिक करा