Saisimran Ghashi
वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म २३ ऑक्टोबर १८८२ रोजी सोलापूर येथे झाला; आईच्या निधनानंतर काकूंनी त्यांचा सांभाळ केला.
गुजरातमधील सौराष्ट्र भागातून आलेले दोशी कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक होऊन बँकिंग व कापसाच्या व्यवसायात कार्यरत होते.
शिक्षणात रस नसल्याने वालचंद यांनी लवकरच शिक्षण सोडले व व्यवसायात आपले भविष्य घडवण्याचे ठरवले.
कापूस व्यापारात नुकसान झाल्यानंतर त्यांनी रेल्वे कंत्राटातून बांधकाम व्यवसायात यश मिळवले.
रेल्वे आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अनुभवातून त्यांनी १९३५ मध्ये 'हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी' स्थापन केली.
१९४० साली 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी' स्थापन करून भारतात विमाननिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली.ghj
ब्रिटिश शिपिंग कंपन्यांशी स्पर्धा करत त्यांनी भारतात स्वतंत्र शिपिंग कंपनी स्थापन केली.
१९५३ मध्ये त्यांचे निधन झाले; पण त्यांनी निर्माण केलेले उद्योग आजही भारताच्या प्रगतीचे अधिष्ठान आहेत.