सकाळ वृत्तसेवा
मेष :
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
वृषभ :
अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मिथुन :
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्क :
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
सिंह :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या :
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ :
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
वृश्चिक :
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
धनु :
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
मकर :
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कुंभ :
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मीन :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.