Puja Bonkile
भारतीय चित्रसृष्टीचा अनभिषिक्त अभिनयसम्राट दिलीपकुमार यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ पठाण. त्यांना 1994 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोयनानगर परिसराला भूकंपाचा धक्का. 250 लोकांचा मृत्यू. मोठ्या प्रमाणात वित्तहानी.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीने द्विशतक झळकाविले.
हवाई दलाच्या स्वनातीत काळाचे शिलेदार ठरलेले "मिग 21' विमान निवृत्त झाले. या विमानाने 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कारगिल युद्धातही ही विमाने वापरली होती.
भारताने दोहा आशियाई क्रीडा गोल्फ सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
सचिन तेंडुलकरने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विक्रमी शतक झळकाविले आणि "लिटल मास्टर' सुनील गावसकर यांच्या 34 कसोटी शतकांच्या जागतिक विक्रमाशी त्यांच्याच उपस्थितीत बरोबरी साधली.
भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा जन्म. भारत सरकारने 1985 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1988 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मभूषण हा सन्मान प्रदान केला.