Puja Bonkile
प्रसिद्ध गुजराती कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी ऊर्फ "धूमकेतू' यांचा जन्म. नाटक, निबंध, आत्मचरित्र इ. प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांच्या "पोस्ट ऑफिस' या कथेला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. त्यांच्या सात उत्कृष्ट कथांचा संग्रह "सप्तपर्ण' या नावाने प्रकाशित झाला आहे.
हीरो होंडा महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 376 धावांचा डोंगर उभारला. महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील ही विक्रमी धावसंख्या आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांचे निधन.
हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी
भारताच्या साईना नेहवालने सुपर सीरिज मालिकेतील हॉंगकॉंग खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
शाहरुख खान आणि काजोल यांच्या 'दिलवाले दुल्हनियॉ ले जाएंगे' या सिनेमाला तब्बल 1000 आठवडे पूर्ण. 10 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सलग 19 वर्षांपासून मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये सुरू होता.
बिल इंग्लिश यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी निवड.