13 December In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

Puja Bonkile

1642

ब्रिटिश सागरसंशोधक ऍबेल टास्मान यांनी न्यूझीलंड बेटे शोधून काढली. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला असलेल्या टास्मानिया बेटाला त्यांच्यावरूनच नाव दिले गेले आहे.

Sakal

1804

उत्तम दर्जा असणारे मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी शब्दकोश करणाऱ्या मोल्सवर्थ व कॅंडी या जोडीतील मेजर टॉमस कॅंडी यांचा जन्म.

Sakal

1996

कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या चंद्रशेखर गोखलेने बांगलादेशच्या झिया उर रेहमानला बरोबरीत रोखून इंटरनॅशनल किताबाचा पहिला नॉर्म पूर्ण केला.

Sakal

2017

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने द्विशतक झळकाविले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील रोहितचे हे तिसरे द्विशतक असून, असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला.

Sakal

2002 -

ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001चा "दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर. भारतीय चित्रपट जगतातील हा सर्वोच्च सन्मान आहे.

Sakal

2001

आत्मघातकी दहशतवाद्यांनी भरदिवसा संसद भवनाच्या आवारात घुसखोरी करून बाँबस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत नऊ सुरक्षा अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करताना धारातीर्थी पडले व पाच दहशतवादी ठार झाले.