पुजा बोनकिले
नकाशाशास्त्रात महत्त्वाची भर घालणाऱ्या मर्केटर गेरहार्ट यांचे निधन. गोलाकार असलेल्या पृथ्वीचे सपाट पृष्ठभागावर नकाशा काढण्याचे तंत्र त्यांनी निश्चित केल्याने नकाशासंग्रह (ऍटलास) तयार करणे शक्य झाले.
कॉंग्रेसचे एक संस्थापक, कायदेपंडित व समाजसुधारक नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म.
गोवा विद्यापीठाने तयार केलेल्या "अ' ते "म' पर्यंतच्या कोकणी विश्वकोशाच्या पहिल्या खंडाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. शिवराम कारंथ यांच्या हस्ते प्रकाशन.
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली गोमटेश्वर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रपती डॉ. शर्मा यांना श्रवणबेळगोळ धर्मपीठातर्फे "धर्मरत्नाकर' ही पदवी प्रदान करण्यात आली.
प्रख्यात गायक पंडित सी. आर. व्यास व तबलावादक पं. निखिल घोष यांना "हाफिज अली खॉं' पुरस्कार जाहीर.
ज्येष्ठ गायक डॉ. बालमुरलीकृष्ण यांनी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना दाक्षिणात्य (कर्नाटक) संगीतातील नृसिंहभरणम हा नवा स्वनिर्मित राग अर्पण केला.
तमिळनाडूचे राज्यपाल डॉ. एम. चेन्ना रेड्डी यांचे निधन.
ईडन गार्डन्सवरील भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अव्वल लेगस्पिनर अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या 434 कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली.
अंतराळात क्ष-किरण (एक्स-रे) उत्सर्जित करणाऱ्या अद्भुत ताऱ्यांचे कोडे उलगडण्यास ‘आयुका’तील युवा शास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय गटास यश.