24 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

Puja Bonkile

2000 

भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले

1998

समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

1996

इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

1992

कवी विंदा करंदीकर यांची साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर

1976

तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे

1955

 इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम जन्म

2014  

भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन

2003

भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन  तुन तुन यांचे निधन