पुजा बोनकिले
ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणिती जॉर्ज हॉवर्ड डार्विन यांचे निधन. विख्यात निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे ते पुत्र. विश्वोत्पत्तिशास्त्र व भूविज्ञान यांतील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी तपशीलवार गतिकीय विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा पाया घातला. वेला-घर्षण (भरती ओहोटीच्या लाटांमुळे निर्माण होणारे घर्षण), भूगणित व वातावरणविज्ञान या विषयात त्यांनी संशोधन केले. त्यांनी काढलेले कित्येक निष्कर्ष जरी आज मान्य नसले तरी त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. विश्वोत्पत्तिशास्त्राच्या विकासात त्यांच्या पद्धती एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मानल्या जातात.
ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना भारतीय साहित्यात सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून "इन्सॅट-2 सी' उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जुळणी केलेला "इन्सॅट - 2 सी' हा तिसरा दळणवळण उपग्रह.
रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी विमल जालान यांची नियुक्ती.
पश्चिम बंगालमधील डाव्या सांस्कृतिक चळवळीचे अध्वर्यू आणि "भारतीय गणनाट्य संघा'च्या संस्थापकांपैकी एक असणारे सुधी प्रधान यांचे निधन
उत्तर आयर्लंडमधील शांतता प्रस्थापनेच्या प्रक्रियेत आघाडीवर राहिलेले नेते जॉन ह्यूम यांची गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड.
ज्येष्ठ योगसाधक गीता अय्यंगार यांचा 61 वा वाढदिवस
बोइंग कंपनीच्या विमानाने जैवइंधन ‘ग्रीन डिझेल’चा वापर करत अवकाशात यशस्वी झेप घेतली. जगातील ही पहिलीच चाचणी.