Saisimran Ghashi
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ६-७ मेच्या मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' राबवले.
या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले.
काळ्या बॅकग्राउंडवर "ऑपरेशन सिंदूर" असे मोठ्या अक्षरात लिहिले असून ‘O’ च्या ठिकाणी सिंदूराने भरलेली वाटी दाखवली आहे, ज्यातून सिंदूर विखुरलेला आहे हे रक्ताचे प्रतीक आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो भारतीय लष्कराच्या मुख्यालयात तैनात असलेल्या दोन सैनिकांनी तयार केला होता कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग.
हा प्रभावी लोगो तयार करण्यास फक्त ४५ मिनिटे लागली, पण त्याचा प्रभाव संपूर्ण देशभर पसरला.
पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या महिलांच्या वैवाहिक जीवनाचा सिंदूर हा प्रतीक असून, त्याच सिंदूरचा वापर लोगोमध्ये करण्यात आला आहे, जो त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
या ऑपरेशननंतर लष्कराने जेव्हा 'न्याय' या संदेशासह छायाचित्र प्रसिद्ध केले, तेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’चे प्रचंड कौतुक झाले.
या कारवाईद्वारे भारताने जगाला दाखवून दिले की आता दहशतवादाविरुद्धची लढाई निर्णायक आणि कठोर असेल.