पश्चिम भागात फळबागांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता, डाळिंब लागवड होतेय कमी

सकाळ डिजिटल टीम

आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात विविध फळबागांचे ४६४ हेक्टर क्षेत्र सध्या आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष यांच्याखालोखाल अन्य क्षेत्र आहे.

Atpadi Orchards

कृषी खात्यामार्फत प्रतिवर्षी मे, जूनच्या दरम्यान नवीन शेतकरी फळबाग लागवडीचे प्रस्ताव सादर करत असतात. यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Atpadi Orchards

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रस्ताव अधिक दाखल झाले आहेत. शासनाच्या कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी तीन वर्षे अनुदान देण्यात येते.

Atpadi Orchards

तालुक्यात डाळिंब फळ पिकाची लागवड दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागांमधील २३ ते २५ गावांमध्ये सध्या विविध अकरा प्रकारच्या फळबागेचे क्षेत्र ४६४ हेक्टर झाले आहे.

Atpadi Orchards

नेलकरंजी ते झरे परिसरात आंबा-१०६ हेक्टर, द्राक्षे-१९३, डाळिंब-७८.१०, पेरू-२३.४०, नवीन प्रकारातील सीताफळ-२१, आवळा-१०.८०, लिंबू-६.४०, केळी-१८, पपई-३, ड्रॅगन फ्रुट-२, सफरचंद-१.५ हेक्टर आहे.

Atpadi Orchards

यामध्ये द्राक्षे, आंबा व डाळिंब या पाठोपाठ कमी प्रमाणात फळबाग क्षेत्र आहे. केळी घाणंद व पपई हे नेलकरंजी गावच्या परिसरात आहे.

Atpadi Orchards

शेतकरी यंदाही जूनमध्ये केशर व हापूस आंबा लागवड करणार आहेत. केशर आंबा फळामध्ये नवीन जात निर्माण करण्यात आली आहे. या नवीन जातीची लागवड शेतकरी करणार आहेत.

Atpadi Orchards

मंडणगड, दापोलीमध्ये जांभ्या सड्यावर आढळली तब्बल 10 हजार वर्ष जुनी कातळशिल्पं