Vinayan Waghmare
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूळ संविधानात २२ ऐतिहासिक चित्रे आहेत. हा अनमोल वारसा आजही संसदेत सुरक्षित जपला आहे.
Constitution
Sakal
शांतिनिकेतनचे सुप्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि त्यांच्या शिष्यांनी संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला ही सुंदर चित्रे हाताने रेखाटली आहेत.
Constitution
Sakal
संविधानाच्या पहिल्या भागात सिंधू संस्कृतीतील सुप्रसिद्ध बैल, तर दुसऱ्या भागात प्राचीन वैदिक गुरुकुल आणि आश्रम व्यवस्था चितारली आहे.
Constitution
Sakal
आदर्श राज्यव्यवस्थेचे प्रतीक म्हणून मूलभूत हक्कांच्या भागात लंका विजयानंतर अयोध्येला परतणारे प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचे चित्र आहे.
Constitution
Sakal
मार्गदर्शक तत्त्वांच्या भागात श्रीकृष्णाचा गीता उपदेश आहे. तर पुढील भागांत शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध व महावीर आहेत.
Constitution
Sakal
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू गोविंद सिंह यांची शौर्यगाथा सांगणारे चित्र संविधानाच्या १५ व्या भागात समाविष्ट आहे.
Constitution
Sakal
झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधींचा दांडी मार्च आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचेही यात चित्रण आहे.
Constitution
Sakal
प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी सुलेखन केलेली ही मूळ प्रत खराब होऊ नये म्हणून संसदेच्या ग्रंथालयात विशेष नायट्रोजन पेटीत ठेवली आहे.
Constitution
Sakal
Chaos Party
Sakal