Anushka Tapshalkar
साखर त्वचेची कोलाजेन पातळी सुधारते आणि त्वचेला तजेलदार बनवते, तर मध त्वचेला पोषण देते. हे मिश्रण त्वचेवर हलक्या हाताने लावा.
बेसन त्वचेतील मळ आणि मृत पेशी काढून टाकते, तर हळद त्वचेला चमकदार बनवते आणि पिंपल्स कमी करते. दुधात किंवा गुलाबपाण्यात मिसळून चेहऱ्यावर हलके स्क्रब करा.
ओट्स चेहऱ्यावरील टॅन आणि डाग कमी करतात, तर दूधाने त्वचेला पोषण मिळते. ओट्स दुधात भिजवून चेहऱ्यावर स्क्रब करा.
कॉफी रक्ताभिसरण सुधारते आणि ब्लॅकहेड्स काढून टाकते, तर खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करून दुरुस्त करते. चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मालिश करा.
तांदळाचे पीठ त्वचेला नैसर्गिक चमक देते, तर दही हायड्रेट करून मऊ बनवते.
संत्र्याच्या सालींची पावडर चेहऱ्यावरील पिंपल्स, डेड स्कीन आणि अतिरिक्त तेल कमी करून त्वचेला तजेलदार बनवते आणि चमक देते.
टोमॅटो त्वचेला टवटवीत ठेवतो आणि साखर उत्तम एक्सफोलिएटर आहे. टोमॅटोच्या फोडीला साखर लावून चेहऱ्यावर स्क्रब करा.
मसूर डाळ त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला इव्हटोन बनवते. गुलाबपाणी किंवा दूध घालून हलक्या हाताने हे स्क्रब चेहऱ्यावर चोळा.