दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटरचा 15 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा

प्रणाली कोद्रे

जवेरिया खान

पाकिस्तानची माजी क्रिकेटपटू जवेरिया खान हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Javeria Khan | X/ICC

15 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा

35 वर्षीय जवेरियाने 15 वर्षे पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळले आहे.

Javeria Khan | X/ICC

दुसरीच क्रिकेटर

ती बिस्माह मारुफ व्यतिरिक्त केवळ दुसरीच पाकिस्तानी महिला क्रिकेटर आहे, जिने वनडे आणि टी२० या दोन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Javeria Khan | X/ICC

आयसीसी स्पर्धा

जवेरियाने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तिने 2009, 2013, 2017 आणि 2022 मध्ये महिला वनडे वर्ल्डकप आणि 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 आणि 2023 साली टी20 वर्ल्डकप खेळले आहेत.

Javeria Khan | X/ICC

कर्णधार

जवेरियाने 17 वनडे आणि 16 टी20 सामन्यांत पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले. ती 2018 आणि 2020 टी20 वर्ल्डकपमध्येही कर्णधार होती.

Javeria Khan | X/ICC

फलंदाजी कामगिरी

तिने 116 वनडे आणि 112 आंतरराष्ट्रीय टी20 सामने असे मिळून एकूण 228 सामने खेळले असून 4903 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

Javeria Khan | X/ICC

गोलंदाजी

तिने आंतराष्ट्रीय कारकिर्दीत 28 विकेट्सही घेतल्या आहेत.

Javeria Khan | X/ICC

ऋतुराज CSK चा चौथा कर्णधार, 'या' दिग्गजांनीही सांभाळली जबाबदारी

Ravindra Jadeja - Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL