Aarti Badade
भारतात एकमेव असं शहर आहे जिथे मांसाहार पूर्णतः बंदी आहे. हे शहर गुजरातमध्ये आहे आणि त्याचं नाव आहे पालिताना.
२०१४ मध्ये गुजरात सरकारने पालितानाला अधिकृतपणे "शाकाहारी शहर" घोषित केलं. येथे मांस, मासे, अंडी खरेदी, विक्री किंवा वापरणे कायद्याने बंद आहे.
पालिताना हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. श्वेतांबर जैन संप्रदायासाठी हे प्रमुख केंद्र मानलं जातं आणि येथे ९०० हून अधिक जैन मंदिरे आहेत.
शहरातलं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे शत्रुंजय पर्वतावरची मंदिरे, जिथे अनेक तीर्थंकरांनी मोक्ष प्राप्त केला आहे. येथे पोहोचण्यासाठी सुमारे ३५०० पायऱ्या चढाव्या लागतात.
जैन मुनींच्या उपोषणानंतर २०१४ मध्ये सरकारने कारवाई करत पालिताना शहरात मांसाहारावर संपूर्ण बंदी आणली. या निर्णयाने पालिताना पूर्णपणे शाकाहारी बनलं.
शहरातील काही मुस्लिम कुटुंबांनीही स्वेच्छेने शाकाहार स्वीकारला. धार्मिक सौहार्द जपण्यासाठी आणि स्थानिक जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
पालितानामध्ये कांदा आणि लसूण विक्रीवरही बंदी आहे. स्थानिक बाजारपेठेत हे घटक सहज उपलब्ध होत नाहीत. शुद्ध सात्विक जीवनशैली इथे अनुसरली जाते.
शहराची अर्थव्यवस्था धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. मंदिरे, धर्मशाळा आणि हॉटेल्समधून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो.
शाकाहारी आहारामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होतो. त्यामुळे पालिताना हे पर्यावरणपूरक आणि शांततामय जीवनशैलीचं प्रतीक ठरतं.