Saisimran Ghashi
पॅरालिसिस किंवा लकवा हा एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग असतो
तो अचानक येतो आणि शरीराच्या एका बाजूवर परिणाम करून हालचाली बंद करतो.
पण अनेकदा आपण त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे किंवा कारणांकडे दुर्लक्ष करतो जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते.
ब्रेन स्ट्रोक हा पॅरालिसिस येण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस अडकल्यास किंवा फुटल्यास मेंदूचं कार्य बिघडतं आणि त्यामुळे शरीराच्या एका बाजूला लकवा येतो.
सतत उच्च रक्तदाब राहिल्यास मेंदूच्या नसा कमकुवत होतात आणि त्यातून स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. हा एक ‘सायलेंट किलर’ असून पॅरालिसिसचा धोका वाढवतो.
डायबेटीस आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्या लवकर खराब होतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि नंतर पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते.
तंबाखू आणि अल्कोहोलमुळे, जास्त ताण, अनियमित झोप, व्यायामाचा अभाव आणि चुकीचे खानपान यामुळे मेंदूवर ताण येतो, ज्यामुळे झटका येण्याचा धोका असतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.