सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री परिणिती चोप्रा एक नवीन गूढ रहस्य थ्रिलर मालिकेत झळकणार आहे.
‘हंसी तो फंसी’, ‘केसरी’, आणि ‘संदीप और पिंकी फरार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमठवणाऱ्या परिणीतीने ओटीटीवर दमदार एंट्री घेतली आहे.
परिणीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने लिहिले, "काही रहस्यं फक्त उलगडत नाहीत, ती तुमचं मन खेचून नेतात."
ही मालिका शिमल्याच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत केली जाणार आहे, जेथे परिणीती एक रहस्यमय कॅबरे डान्सरची भूमिका साकारत आहे.
मालिकेत परिणीतीसोबत ताहीर राज भसीन, अनुप सोनी, जेनिफर विंगेट, चैतन्य चौधरी, हर्लीन सेठी आणि सोनी राझदान यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
सिद्धार्थ पी. मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा हे निर्माते असून, दिग्दर्शनाची जबाबदारी रेंसिल डी'सिल्वा यांनी घेतली आहे.
परिणीतीचा हा ओटीटीवरील चौथा प्रोजेक्ट असणार आहे.