Monika Lonkar –Kumbhar
नाशपाती हे एक मऊ आणि गोड चवीचे फळ आहे.
काहीसे सफरचंदासारखे दिसणारे हे फळ पावसाळ्याच्या सिझनमध्ये खायला मिळते.
नाशपातीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे विपुल प्रमाण आढळते. आपल्या आरोग्यासाठी नाशपाती फायदेशीर आहे.
नाशपातीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात आढळते.
नाशपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
नाशपातीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
नाशपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे, वजन नियंत्रित करण्यास मदत होते.