Shubham Banubakode
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथील चौरासी मंदिर समूहात धरमराज मंदिर आहे. हे मंदिर मृत्यूचा देवता यमराजाला समर्पित आहे.
असे मानले जाते की हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे यमराजाचे दरबार भरतो आणि म्हणूनच लोक या मंदिरात जाण्यास टाळतात.
मान्यतेनुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची आत्मा याच मंदिरात आणली जाते. जिथे चित्रगुप्त त्यातीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात.
या मंदिराला चार दिशांना चार खास दरवाजे आहेत, जे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंनी बनलेले आहेत.
मंदिरात एक खोली आहे जी चित्रगुप्ताची खोली म्हणून ओळखली जाते. या खोलीत कोणतीही मूर्ती नाही, असे मानले जाते की चित्रगुप्त इथे व्यक्तीच्या कर्मांचा लेखाजोखा वाचतात.
या मंदिराविषयी असलेल्या मान्यतांमुळे लोक आत जाण्यास घाबरतात. इतकंच काय तर या मंदिराच्या शेजारून जाणंही टाळतात.
या मंदिराच्या स्थापनेसंदर्भात स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की राजा मेरू वर्मन यांनी सहाव्या शतकात या मंदिराचे नूतनीकरण केले.
भाऊबीजच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजा होते, जिथे लोक अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात.