Puja Bonkile
एखादी भाग्यकारक घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.