Puja Bonkile
प्रियजनांचा सहवास लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मन आनंदी व आशावादी राहील.
जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
नवीन परिचय होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.