Puja Bonkile
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.