Horoscope 1 May : 'या' राशीच्या व्यक्तींचा इतरांवर प्रभाव राहील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ

गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

धनु

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मीन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.