Horoscope 7 May : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन

आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

मकर

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.