Horoscope 2 May : 'या' राशीच्या व्यक्तींचा वेळ अन् पैसा वाया जाण्याची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

मिथुन

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क

अपेक्षित सुसंधी लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

सिंह

हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

कन्या

नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कामे मार्गी लागतील.

धनु

आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.

मकर

अपेक्षित संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन

तुमचा जनसंपर्क वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.