Horoscope 15 May : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरीत समाधानकारक स्थिती राहील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ

कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या

वादविवाद टाळावेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ

आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक

संततीसौख्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

मकर

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कुंभ

वाहने जपून चालवावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.