Horoscope 8 May : 'या' राशीच्या व्यक्तींचे प्रवास सुखकर होतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कर्क

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह

गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या

कोणालाही जामीन राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल

तूळ

शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

धनु

संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ

काही कामे धाडसाने पार पाडाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.