Horoscope 4 May : 'या' राशीच्या व्यक्ती सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृषभ

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील.

वृश्‍चिक

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु

काही कामे धाडसाने पार पाडाल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कुंभ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मीन

शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.