Horoscope 2 June : 'या' राशीच्या व्यक्तींना मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क

प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह

काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

मन आनंदी व आशावादी राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

तूळ

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृश्‍चिक

संतती सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

धनु

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंवाद साधाल.

मकर

गुरूकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ

व्यवसायात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.