Horoscope 9 March 2025: 'या' राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल

Puja Bonkile

मेष :

जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या | esakal

तुळ :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तुळ

वृश्‍चिक :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक

धनु :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.