Horoscope 6 July 2025: आज आषाढी एकादशी, 'या' राशीच्या लोकांची व्यवसायात वाढ होईल

पुजा बोनकिले

मेष :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कन्या :

व्यवसायात वाढ होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तुळ :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

कुंभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन :

कोणालाही जामीन राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.