Aarti Badade
कबुतरांच्या विष्ठेमध्ये बुरशी, बॅक्टेरिया आणि प्रथिने असतात जे श्वसनास धोका निर्माण करतात.
दररोज विष्ठेच्या संपर्कात आल्याने दमा, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुस जळजळ यांसारखे त्रास वाढतात.
नाक वाहणे, डोळे खाजणे, शिंका येणे यासारखी लक्षणे विष्ठेतील घटकांमुळे दिसून येतात.
हिस्टोप्लास्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस यांसारख्या गंभीर आजारांची शक्यता निर्माण होते.
बाल्कनी व टेरेसला जाळी लावा. कबुतरांची अंडी, पिसं आणि विष्ठा लगेच हटवा.
हातमोजे व मास्क वापरा. विष्ठा झाडू किंवा व्हॅक्यूमने काढू नका — जंतुनाशकाचा वापर करा.
कबुतरांशी मैत्री छान वाटते, पण त्यांची उपस्थिती तुमचं आणि कुटुंबाचं आरोग्य धोक्यात आणू शकते.
कबुतरांपासून अंतर ठेवा आणि आपल्या घराला व आरोग्याला वाचवा!