पिस्त्याचं झाड बघितलं का? 'येथे' सर्वाधिक लागवड

संतोष कानडे

पिस्ता

पिस्ता हा इराणचं ड्रायफ्रूट आहे. सगळ्यात अगोदर पिस्त्याची शेती इराणमध्ये केली जात होती.

pista

अमेरिका

सध्या अमेरिकेमध्ये सर्वात जास्त पिस्ता शेती केली जाते. पिस्त्याचं झाड एकदा लावल्यानंतर ३०० वर्षे उत्पन्न देऊ शकतं.

ड्रायफ्रूट

पिस्त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. ड्रायफ्रूट म्हणून हे खाल्लं तर जातंच पण याच्यापासून तेलही निघतं.

औषधी

पिस्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असता. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या गंभीर आजारांमध्ये पिस्ता फायदेशीर ठरतो.

महाग

उत्पादन कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे पिस्ता अतिशय महाग असतो. भारतामध्ये राजस्थान या राज्यात पिस्त्याचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं.

पंजाब

तसेच हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जिथे सर्वाधिक गरमी आणि सर्वाधिक थंडी असते, तिथे पिस्त्याची शेती केली जाते.

जमीन

पिस्ता शेतीसाठी चांगलीच जमीन पाहिजे, असं नाही. साध्या जमिनीतही हे झाडं चागलं येतं.

जाती

भारतामध्ये पिस्त्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. ज्यात पीटर, रेड अलेप्पो, जॉली, चीकू आणि केरमन या जाती प्रमुख आहेत.

उत्पन्न

पिस्त्याचं झाड साधारण ३० फूट उंच वाढतं. झाडांपासून उत्पन्न मिळवण्यासाठी साधारण १२ वर्षांचा अवधी लागतो.

झाड

प्रत्येक झाड ८ ते १२ किलोपर्यंत उत्पादन देऊ शकतं. एका एकरामध्ये साधारण १९५ ते २०० लावता येतात.

किलोचा भाव

बाजारामध्ये पिस्त्याचा भाव ८०० ते १५०० रुपये किलो इतका आहे. शेतकऱ्याला एका एकरातून ३० ते ३५ लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं.