पिस्ता आरोग्यासाठी चांगला.. पण दिवसात कधी आणि किती खावा?

Aishwarya Musale

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. हिवाळ्यात पिस्ता खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. पिस्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक तत्वे आढळतात.

आजार

ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. पिस्ता खाल्ल्याने आपले चयापचय वाढते जे आपल्याला सर्दी आणि इतर आजारांपासून वाचवण्यास मदत करते. हे आपली त्वचा, केस आणि नखांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

किती पिस्ते खावेत?

निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 3 ते 4 पिस्ते खावेत. पिस्ता खाल्ल्याने एनर्जी लेव्हल वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडे आणि दात मजबूत होतात. गर्भवती महिलांसाठी दररोज 2 ते 3 पिस्ते खाणे अधिक फायदेशीर आहे.

मात्र, एका दिवसात 4 पेक्षा जास्त पिस्ता खाणे योग्य नाही. पिस्ता जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या काही समस्याही उद्भवू शकतात. जसे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, जुलाब इ.

रिकाम्या पोटी खा

सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाणे अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी पिस्ता खाण्याचा विचार करत असाल तर ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

हृदयासाठी फायदेशीर

पिस्ता हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पिस्ता रोज खाल्ल्याने रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे.

त्वचेसाठी फायदेशीर

पिस्त्यामध्ये आढळणारे पोषक तत्व त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. पिस्त्यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्ससारखे अनेक घटक असतात जे आपल्या त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात.

हाडे मजबूत

पिस्तामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या देखील दूर होतात.

डाळिंबाचा रस दररोज पिण्याचे आरोग्यदायी फायदे!