मोदींच्या मंत्रिमंडळात ६ वकिल १ सीए आणि १ अभिनेता

Monika Lonkar –Kumbhar

नितीन गडकरी

मोदींच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नितीन गडकरींनी वकिलीची पदवी मिळवली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया

पहिल्यांदाच भाजपतर्फे निवडणूक लढवून विजयी झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी एमबीएची पदवी घेतली आहे.

जेपी.नड्डा

केंद्रीय मंत्री जेपी.नड्डा यांनी देखील एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

एस.जयशंकर

मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झालेले केंद्रीय मंत्री एस.जयशंकर यांची पीएचडी झाली असून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

पीयूष गोयल

केंद्रीय मंत्रीपदी शपथ घेणारे पीयूष गोयल हे चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आहेत.

किंजरापु राममोहन नायडू

मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे किंजरापु राममोहन नायडूंनी बीटेक आणि एमबीए पूर्ण केले आहे.

सर्बानंद सोनोवाल

मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणारे सर्बानंद सोनोवाल यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

मनसुख मांडविया

मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी शपथ घेणारे मनसुख मांडवियांनी पीएचडी पूर्ण केली आहे.

भूपेंद्र यादव

केंद्रीय मंत्रिपदी शपथ घेणाऱ्या भूपेंद्र यादवांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

चिराग पासवान

केंद्रीय मंत्रीपदी शपथ घेतलेल्या चिराग पासवान यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयातही जम बसवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.

किरण रिजिजू

मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी शपथ घेणाऱ्या किरण रिजिजू यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

मोदी 3.0 मंत्रिमंडळात कोणत्या महिलांना मिळाले स्थान