कार्तिक पुजारी
पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधाप्रकरणी अमेरिकेत अद्यापही चर्चा सुरुच आहे.
२०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी यांच्यामध्ये लैंगिक संबंध असल्याचं समोर आलं होतं.
दाव्यानुसार, ट्रम्प यांनी हे संबंध लपवण्यासाठी स्टॉर्मी यांना एक लाख ३० हजार डॉलर इतके पैसे दिले होते.
स्टॉर्मी यांनी ट्रम्प यांच्यासोबत घालवलेल्या एका रात्रीबाबत सांगितलं. ट्रम्प यांनी स्टॉर्मी यांच्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
स्टॉर्मी यांनी सांगितलं की, ट्रम्प एका रात्री त्यांच्याकडे आले होते. ट्रम्प यांनी त्यांना पॉर्न इंडस्ट्रीबाबत विचारलं.
शिवाय टेस्ट केली आहे का असंही विचारलं. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, ते आणि त्यांची पत्नी वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपतात.
ट्रम्प कपडे बदलून बॉक्सर आणि टी शर्टमध्ये बेडवर आले. ट्रम्प यांनी कंडोम देखील वापरला नाही.