Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ५८ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार होता.
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात होता. पण १०.१ षटकानंतर सुरक्षेच्या कारणाने रद्द करण्यात आला.
दरम्यान, १०.१ षटकापर्यंत पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगने २८ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली.
त्याने आयपीएलमध्ये सलग चौथे अर्धशतक होते. त्यामुळे त्याच्या नावावर विक्रम केले आहेत.
तो आयपीएलमध्ये सलग ४ अर्धशतके करणारा चौथा भारतीय ठरला.
प्रभसिमरनच्या आधी विरेंद्र सेहवाग (५), विराट कोहली (४) आणि शिखर धवन (४) यांनी असा विक्रम केला आहे.
तसेच प्रभसिमरन हा पंजाबकडून सलग ४ अर्धशतके करणारा पहिलाच खेळाडू आहे.
याशिवाय प्रभसिमरन सलग ४ अर्धशतके करणारा पहिला अनकॅप खेळाडूही आहे.