प्राजक्ता माळीने नाव का बदललं?

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट पोस्टची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात तिने बदल केल्याचं जाहीर केलं 

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिचं संपूर्ण नाव 'प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी' असं जाहीर केलं आणि सोबत एक पोस्ट शेअर केली.

''नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावा नंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे, अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे.'', असं प्राजक्ता म्हणाली.

“आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.''

प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी त्यांना निर्णय पसंत पडला नाही असं म्हंटल. 

काहींनी "मुलीच्या लग्नानंतर तिने कसं नाव लावायचं?" असा प्रश्न प्राजक्ताच्या पोस्टवर विचारला. तर काहींनी यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे आपण सोडवायला हवेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वतःच्या आईचं नावसुद्धा संपूर्ण नावात जोडलं.

दरम्यान प्राजक्ता लवकरच 'भिशी मित्रमंडळ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत